"माझ्या कविता"
रविवार, २३ सप्टेंबर, २०१२
समाधान
आकाशाएवढि,
तुझी झेप नाही;
पण म्हणून,
तू काही बुटका नाही..
तू मागितलेलं,
तुझ्या प्राक्तनात नसेलही;
पण तरीही,
तुला मिळालेलं कमी नाही..!!!
- माधवी ( मनाली कुळकर्णी )
" स्व- अभिमान "
तुला माफ करणारी,
मी कोण ??
मला माझाच अहंकार,
सावरता आला नाही..
म्हणून तू शिक्षा हि केलीस,
मला नाही म्हणता आलं नाही..
आज तुझं चुकलं,म्हणून तू,
माफीची अपेक्षा करतोस..
पण गिळलेले अश्रू,
आज परवानगी देत नाहीत..!!
- माधवी ( मनाली कुळकर्णी )
रविवार, ३ एप्रिल, २०११
शब्द जपून वापरावेत,
शब्दरूपी घडा तुमचा,आकार द्याल तसे घडावेत...
शस्त्रापरी धारधार,त्याचे घायाळ करणे;
मधाहून गोड त्यांचे वाटणे....
अजब हि करामत शब्दांची,
वळतील तसे,ग्वाही फक्त मनाची ...!!!!
- माधवी ( मनाली कुळकर्णी )
शनिवार, १९ मार्च, २०११
काळा ढग
ध्यानी मनी नसताना,
अश्याच एका रात्री,भूतकाळ डोळ्यामधून बरसतो...
अश्याच एका दिवशी,
दाटलेला तो एक काळा ढग,मग सुर्यालाही झाकतो......!!!
- माधवी ( मनाली कुळकर्णी )
सोमवार, १४ मार्च, २०११
जाणीवेच्या पलिकडले
जाणीवेच्या पलीकडले व्यक्त तरी करू कसे???
'काटे' म्हणून हिणवल्यानंतर पाकळीचे गळून जाणे जसे....!!!
- माधवी ( मनाली कुळकर्णी )
रविवार, २७ फेब्रुवारी, २०११
गंध
नात्यांचा गंध उडाला,
कि सुगंधाची परिभाषा बदलली??
नेमके काय कळायच्या आतच,
अवेळी ती 'संध्याकाळ' अवतरली....!!!
- माधवी ( मनाली कुळकर्णी )
गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११
अर्थ प्रेमाचा
जीव माझा,कासावीस झाला,
जेव्हा नजरेतून तू हरवला;
शोधले सारीकडे,ना शोधले मनात;
जिथे तू उतरला ....
तुजसाठी आसुसलेल्या मला,
प्रेमाचा अर्थ,जरा उशीरच कळला;
तुझे जातानाचे शब्द,मनी गुंजी घालत,
डोळ्यातुनी बरसण्याआधी,तू आयुष्यात परतला ..
तू आयुष्यात परतला........!!!!!
- माधवी ( मनाली कुळकर्णी )
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)