पुरतो श्वास का कधी,
हे आयुष्य जगण्यासाठी;
नेहमीच करायचे राहून जाते,
काही-बाही तुझ्यासाठी......
कितीक स्वप्न मोडले,
कितीक आस तुटल्या;
तरी साथ दिलीस तू मला,
माझ्याच शब्दाआधी ...
कितीक सांगू तुझे प्रेम,
अन धडपड हि अपुल्यांसाठी;
ठरलो मी 'नदीच',
अन तू झालीस 'सागर' ह्या प्रपंचासाठी.....
कितीक निस्वार्थी तुझे मन;
कसे जमते गं वागणे,नेहमीचं उमजून......
दगदगीत ह्या साऱ्या,
हेच शिकायचे राहून गेले;
श्वास संपत आला तरी,
तुझ्यासाठी 'तुझ्यासारखेच' जगायचे राहून गेले.....!!!!!!!
-माधवी (मनाली)
chan!!!!!!!!
उत्तर द्याहटवातुझे शब्द वाचून, मन माझे दाटले
उत्तर द्याहटवामग वाटले खरच, जगयाचे राहून गेले तिच्या सारखे तिच्या साठी ......
अप्रतिम मानली .........
प्रेम ही भावना खरोकहर्च अव्र्णनीय आहे...प्रत्येक कवी आपापल्या त-हेने त्याला अर्थ लावतो..आणि प्रेमात होना-या आणाभाखांचे राहून गेले रिक्त पण चांगल्या शब्दांत तू नमूद केले आहे
उत्तर द्याहटवा