रविवार, ३ एप्रिल, २०११
शनिवार, १९ मार्च, २०११
काळा ढग
ध्यानी मनी नसताना,
अश्याच एका रात्री,भूतकाळ डोळ्यामधून बरसतो...
अश्याच एका रात्री,भूतकाळ डोळ्यामधून बरसतो...
अश्याच एका दिवशी,
दाटलेला तो एक काळा ढग,मग सुर्यालाही झाकतो......!!!
- माधवी ( मनाली कुळकर्णी )
सोमवार, १४ मार्च, २०११
जाणीवेच्या पलिकडले
जाणीवेच्या पलीकडले व्यक्त तरी करू कसे???
'काटे' म्हणून हिणवल्यानंतर पाकळीचे गळून जाणे जसे....!!!
- माधवी ( मनाली कुळकर्णी ) 'काटे' म्हणून हिणवल्यानंतर पाकळीचे गळून जाणे जसे....!!!
रविवार, २७ फेब्रुवारी, २०११
गंध
नात्यांचा गंध उडाला,
कि सुगंधाची परिभाषा बदलली??
नेमके काय कळायच्या आतच,
अवेळी ती 'संध्याकाळ' अवतरली....!!!
- माधवी ( मनाली कुळकर्णी )
गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११
अर्थ प्रेमाचा
जीव माझा,कासावीस झाला,
जेव्हा नजरेतून तू हरवला;
शोधले सारीकडे,ना शोधले मनात;
जिथे तू उतरला ....
तुजसाठी आसुसलेल्या मला,
प्रेमाचा अर्थ,जरा उशीरच कळला;
तुझे जातानाचे शब्द,मनी गुंजी घालत,
डोळ्यातुनी बरसण्याआधी,तू आयुष्यात परतला ..
तू आयुष्यात परतला........!!!!!
- माधवी ( मनाली कुळकर्णी )
जेव्हा नजरेतून तू हरवला;
शोधले सारीकडे,ना शोधले मनात;
जिथे तू उतरला ....
तुजसाठी आसुसलेल्या मला,
तुझे जातानाचे शब्द,मनी गुंजी घालत,
तू आयुष्यात परतला........!!!!!
- माधवी ( मनाली कुळकर्णी )
रविवार, ३० जानेवारी, २०११
प्रेमळ नात
चांदण्यांची शीतलता,
मज तुझ्यात गवसली ;
ग्रीष्मात हि बहर फुलण्याची कला,
तुझ्यामूळेच उमजली...
काजळातील कोरीव नयनात तुझ्या,
नजर माझी हरवली ;
झुकवत पापण्यांना,लाजून तू,
ह्या प्रेमळ नात्याची सुरुवात केली...
सुरुवात केली.....!!!!!
- माधवी ( मनाली कुळकर्णी )
मज तुझ्यात गवसली ;
ग्रीष्मात हि बहर फुलण्याची कला,
तुझ्यामूळेच उमजली...
काजळातील कोरीव नयनात तुझ्या,
नजर माझी हरवली ;
झुकवत पापण्यांना,लाजून तू,
ह्या प्रेमळ नात्याची सुरुवात केली...
सुरुवात केली.....!!!!!
- माधवी ( मनाली कुळकर्णी )
समाधान
नक्षत्रांचे देण,पदरात पडूनही
तो रिकामाच राहतो ;
अन समाधानाचे आत्मिक सुख,
जगण्याला अर्थ देतो...
ज्याचे त्याचे प्राक्तन म्हणावे,
कि ज्याची त्याची इच्छा ;
घडणारे घडतेच,टोचणारे दगड समजावे
मिळणारी ती भिक्षा...!!!
- माधवी ( मनाली कुळकर्णी )
तो रिकामाच राहतो ;
अन समाधानाचे आत्मिक सुख,
जगण्याला अर्थ देतो...
ज्याचे त्याचे प्राक्तन म्हणावे,
कि ज्याची त्याची इच्छा ;
घडणारे घडतेच,टोचणारे दगड समजावे
मिळणारी ती भिक्षा...!!!
- माधवी ( मनाली कुळकर्णी )
रविवार, २३ जानेवारी, २०११
समाजाच्या धाकापाई ,
माझ्यातली मी गढूळ करू का??
कि त्याच गढूळ समाजाची मोडून मक्तेदारी ,
माझ्या अस्तित्वाची अब्रू जपू का??
( खरच खूप गहन प्रश्न आहे )
-माधवी ( मनाली कुळकर्णी )
माझ्यातली मी गढूळ करू का??
कि त्याच गढूळ समाजाची मोडून मक्तेदारी ,
माझ्या अस्तित्वाची अब्रू जपू का??
( खरच खूप गहन प्रश्न आहे )
-माधवी ( मनाली कुळकर्णी )
शुक्रवार, २१ जानेवारी, २०११
दडपण
मनातले दडपण ते,
डोळ्यात येऊन विसावले ;
अश्रूनी हि मग लपण्यासाठी,
पापण्यांना निजवले ....!!!
- माधवी (मनाली कुळकर्णी)
डोळ्यात येऊन विसावले ;
अश्रूनी हि मग लपण्यासाठी,
पापण्यांना निजवले ....!!!
- माधवी (मनाली कुळकर्णी)
बुधवार, १२ जानेवारी, २०११
किनार
तिला मिळावा एकांत म्हणून ,
मी समुद्राची साथ धरली;
तिच्या निरोपाची वाट पाहता-पाहता
आता सागरास हि ओहोटी लागली ....
किनारा दूर गेला अन,
ती मनात रुतत गेली ;
वाट पाहण्याऐवजी तिची,
मीच पुढाकाराची सोयरिक केली..
तिच्या संगत जेव्हा जेव्हा,
ह्या मऊ वाळूत बसतो;
तेव्हा तेव्हा सागरा,
तुझे आभार मानतो...
त्यावेळी जर तुला,
ओहोटी लागली नसती ,
तर आज माझ्या नशिबाला,
तिची किनार नसती....
तिची किनार नसती..!!!
-माधवी (मनाली कुळकर्णी )
मी समुद्राची साथ धरली;
तिच्या निरोपाची वाट पाहता-पाहता
आता सागरास हि ओहोटी लागली ....
किनारा दूर गेला अन,
ती मनात रुतत गेली ;
वाट पाहण्याऐवजी तिची,
मीच पुढाकाराची सोयरिक केली..
तिच्या संगत जेव्हा जेव्हा,
ह्या मऊ वाळूत बसतो;
तेव्हा तेव्हा सागरा,
तुझे आभार मानतो...
त्यावेळी जर तुला,
ओहोटी लागली नसती ,
तर आज माझ्या नशिबाला,
तिची किनार नसती....
तिची किनार नसती..!!!
-माधवी (मनाली कुळकर्णी )
स्त्री
बाहुल्यांच्या खेळातून ;
कधी बाहेर पडणार तू??
कुंकवाचे मोल;
कधी पेलणार तू?
पुरुषप्रधान संस्कृतीत ,
तुला मागासच समजतात;
खांद्याला खांदा लावून चालण्याला ,
तुझा 'आगाऊपणा' म्हणतात ......
चूल-मुल ओठात नसले तरी ,
मनात कायम आहे ;
MODERN WIFE सह,
EXPECTATIONS ची चौकट तीच आहे....
तुझा प्रगतीचा आलेख,
किती उंच जरी,
पुरुषांपुढे तुला,
दुय्यमच स्थान;
पुरुषी अहंकाराकडून,
काय दुसरे मागणे??
बायका-बायकामधेच
जिथे ओढाताण .......
स्त्री चा जन्म घेताना ,
सोशिकतेच दानच,तुला मिळालय ;
कुंकवाच्या बंधनात अडकून,
नाती विणण्यासाठी, देवानेही तुलाच निवडलय.....!!!
- माधवी (मनाली कुळकर्णी )
कधी बाहेर पडणार तू??
कुंकवाचे मोल;
कधी पेलणार तू?
पुरुषप्रधान संस्कृतीत ,
तुला मागासच समजतात;
खांद्याला खांदा लावून चालण्याला ,
तुझा 'आगाऊपणा' म्हणतात ......
चूल-मुल ओठात नसले तरी ,
मनात कायम आहे ;
MODERN WIFE सह,
EXPECTATIONS ची चौकट तीच आहे....
तुझा प्रगतीचा आलेख,
किती उंच जरी,
पुरुषांपुढे तुला,
दुय्यमच स्थान;
पुरुषी अहंकाराकडून,
काय दुसरे मागणे??
बायका-बायकामधेच
जिथे ओढाताण .......
स्त्री चा जन्म घेताना ,
सोशिकतेच दानच,तुला मिळालय ;
कुंकवाच्या बंधनात अडकून,
नाती विणण्यासाठी, देवानेही तुलाच निवडलय.....!!!
- माधवी (मनाली कुळकर्णी )
गुरुवार, ६ जानेवारी, २०११
जगण्याचा हक्क
भावनांचा गोतावळा,
साठला होता मनात
कधीतरी त्याचा हि,
स्फोट होणारच होता;
ठिणगीचे कारण अन,
वणव्यातच अंत निश्चीत होता...
साठलेले मनात सारे,
बेचिराख झाले ;
कडव्या आसवांवर तो,
खळीचा विजय होता ....
दाहाचे चटके झेलुनी,
जखमा सुकण्याचा काळ आला ;
कधीकाळचा जमा मळभ तो,
दूर सारायचा होता....
होरपळलेल्या मनात आता,
निरव शांतता पसरली;
घुसमटनाऱ्या श्वासालाही;
जगण्याचा हक्क होता ...!!!!
-माधवी ( मनाली कुळकर्णी )
साठला होता मनात
कधीतरी त्याचा हि,
स्फोट होणारच होता;
ठिणगीचे कारण अन,
वणव्यातच अंत निश्चीत होता...
साठलेले मनात सारे,
बेचिराख झाले ;
कडव्या आसवांवर तो,
खळीचा विजय होता ....
दाहाचे चटके झेलुनी,
जखमा सुकण्याचा काळ आला ;
कधीकाळचा जमा मळभ तो,
दूर सारायचा होता....
होरपळलेल्या मनात आता,
निरव शांतता पसरली;
घुसमटनाऱ्या श्वासालाही;
जगण्याचा हक्क होता ...!!!!
-माधवी ( मनाली कुळकर्णी )
मंगळवार, ४ जानेवारी, २०११
प्रवाहाच्या विरुद्ध
अंधाराची भीती वाटली,उजेडात जाऊ कशी मी ???
मुद्दामून डोळे मिटलेल्या,इथल्यांना उठवू तरी कशी मी???
हतबल मी, स्वतःवरच हिरमुसते अन,
शोधते वाट मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेची ...!!
-माधवी (मनाली कुळकर्णी )
मुद्दामून डोळे मिटलेल्या,इथल्यांना उठवू तरी कशी मी???
हतबल मी, स्वतःवरच हिरमुसते अन,
शोधते वाट मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेची ...!!
-माधवी (मनाली कुळकर्णी )
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)