रविवार, २६ डिसेंबर, २०१०

आस

शेतकऱ्याचा जीव तो ,
                पावसापारीस टांगला ;
अवेळी बरसून त्याने,
                      वेगळाच धुमाकूळ घातला...

झाले सारे महाग,
न खाता कांदा ,डोळ्यातुनी बरसला ;
       सामान्य तो,
पोटापायी,सरकारवर उखडला ;
          कैफियत कोणासमोर मांडली,
         ज्यांना ना निस्तरे.
 स्वतःचाच घोटाळा ...

पावसा,कष्टावरचे पोट तू,
असे मारू नकोस ;
पुढारीसारखा  कृतघ्न तू ,
होऊ नकोस...

ऐक रे ,व्यथा तू,
                  ह्या गरजू गड्यांची;
लाच खाऊ नेत्यांपारीस,
                                              तूजकडूनच आस,आम्हास न्यायाची ....!!!!

-माधवी ( मनाली कुळकर्णी )



बुधवार, १ डिसेंबर, २०१०

तुझी आठवण

' तुझी आठवण ' अवेळी ,
आगन्तुकासारखी नेहमीचं येते ;
नको असलेल्या क्षणांची हुरहूर देऊन,
कालांतराने मागे फिरते...

मधल्या घटकात माझा जीव मात्र,
पणाला लावते;
अन माझी स्वः ताच स्वः ताशी
लढाई सुरु होते;
भोळी ती,
आयुष्यात नसलेल्या
अन मनात जपलेल्यांची,
सांगड घालू पहाते....

नसते तिला कसलेच भान ;
नाते तोडून देणाऱ्या,निष्ठुर शब्दांची ना तिला जाण...

अश्या मग्रूर शब्दांची मक्तेदारी मोडत ती,
गतकाळातील तुझे अस्तित्व शोधत असते ;
ह्या साऱ्या उलाढालीत तिला भविष्याची ,
साधी फिकीरही नसते ;
अन वर्तमान मात्र तिच्या ,
उघड्या,लाचार डोळ्यांमधून झिरपत  राहते ...
' तुझी आठवण ' अशीच अवेळी,
आगन्तुकासारखी नेहमीचं येते .....!!

- माधवी (मनाली कुळकर्णी )

शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०१०

कविता

" शब्दांना तो सल्पविराम , घौडदोड कवितेची ना येथेच थांबायची ...
मनातले मनातच साठले , देर ती लेखणीतुनी कागदावरी उतरायची ....!! '
                                                                    
- माधवी ( मनाली कुळकर्णी )

गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०१०

दिवाळी पहाट

" रांगोळीचे रंग, पणत्यांचा मंद प्रकाश ....
फराळाचा गोड आस्वाद आणि फटाक्यांनी  लखलखणारे आकाश ..
उटण्याचा सुवास आणि ओवाळंणीचा थाट...
साजरी करूयात,उजाडली आज 'दिवाळी पहाट'..... "                                                    -माधवी (मानली कुळकर्णी )
" दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा " तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ....
                                                     -m@N! n FAMILY .......

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०१०

बाबा; फक्त तुमच्यासाठी,


सागरागत माया तुमची,
आभाळागत विशाल,तुमचे मन ;
वटवृक्षापरी सावली तुमची,
ओंजळी भरून वाहिली,
दिलेत इतुके 'आनंदाचे धन'....

कधी व्यक्त करायचे राहून गेले,
कधी शब्दच ना सापडले;
पण 'बाबा' तुमचे हे प्रेम,
जीवनात अत्तरागत दरवळले,
गंध देऊनी सुखाचा,
सारेच कसे स्वर्गगत वाटले.....!!!

-तुमची लाडकी लेक ;
                      माधवी (मनाली)..!!

बुधवार, २९ सप्टेंबर, २०१०

'हरविली ती माणुसकी '

माणुसकीला हरविलेल्या जगात,
शोधू कुठे मी स्वतला??
कळीनेहि उमलायचे नाकारले जिथे,
बीज रोवायचे धाडसही होईना,आता मला...!!!
                               -माधवी (मनाली कुळकर्णी )

सोमवार, २७ सप्टेंबर, २०१०

माझी उमेद



समुद्राच्या पाण्यात मला खेळायला फार आवडतं;
लाटांच्या खळखळणाऱ्या आवाजाने माझे मन खूप सुखावत...

गूढ,खोल,अथांग,क्षितीज असणाऱ्या सागराकडे,
मी आपोआपच खेचली जाते ;
अन जाणवते कि,
पहिल्या प्रेमाचे आकर्षणही याहून काही वेगळे नसते...

अंगावर आदळणाऱ्या त्या लाटा,मला नखशिखांत भिजवतात,
त्यांचा हक्कच,त्या बजावतात ;
रक्तापेक्षा हि श्रेष्ठ,अशी नातीच जणू
त्यावेळी अलगद येऊन,मला मिठी मारतात ..

आपादमस्तक भिजवणारी ती लाट,
जाते परत निघून,
मला मात्र त्या 'कटू' आठवणींमध्ये सोडून,
काहीशी दुखावून ;
निसटत्या वाळूसम मागे पडतो भूतकाळ,
अन गालावरून नकळत घरंगळणारी,
ती खारट चव,
समुद्राच्याच पाण्यात कुठेतरी,
मग जाते विरघळून....

कधी अल्लड ,कधी मिश्कील,
अश्या समुद्रातून अजून एक लाट येते,
परत मला नाहू घालते ;
पण ह्यावेळी मात्र,
'भूत' आणि 'भविष्य' यामधील,
दूर सरलेल्या ' वर्तमानात '
मला जगायला  शिकवते...

बेधुंद होऊन,त्यानंतर मी येणाऱ्या प्रत्येक लाटेत,
स्वताला हरवून बसते ;
थोडीशी मस्ती,थोडीशी खोडकर अन थोडीशी लहान,
यांसह मी त्या लाटांशी तासन -तास खेळत राहते.....

अश्या निरागस आनंदाचे,
अन वेळेचे गणित कधीच का जमत नाही??
खंत हि माझी अन समुद्राची हि,
आता ओहोटीकडे कडे झुकू लागते ;
अखेर सूर्य हि मावळतो,
दिवसही पांगतो,
पण चेहऱ्यावर उमटलेली,
समाधानाची पुसटशी लकेरही,
माझ्या जगण्याला मात्र,
नवी उमेद देऊन जाते,
नवी उमेद देऊन जाते....!!!!!

   -माधवी (मनाली कुळकर्णी)


रविवार, २६ सप्टेंबर, २०१०

आकार




रंगुनी रंगात,रंग माझा वेगळा;
    साचे सारेच एक परी,घडणारा आकार तो वेगळा .....!!!
-माधवी (मनाली कुळकर्णी )

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०१०

अन्तःकरणातील प्रश्न


    कोणास जवळ करावं,कोणास दूर लोटाव,
हे ज्याचे त्याने ठरवावं;
कधी जवळचेच चटके देऊन जातात,
   तरी कधी दूरचे त्या चटक्यांवर मलम लावतात...!

-माधवी (मनाली कुळकर्णी)

बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०

परीस स्पर्श

कळीने उमलताना नवी स्वप्ने पाहिली;
पहाटे,परीस स्पर्शाने,
सोनेरी ती भासली...
अशीच तुमची माझ्या आयुष्यातली सावली;
साधा काठचा छोटा दगड मी,
तुम्हासच त्यात,
शिंपल्यातील मोती मी वाटली...!!!!!
- माधवी
(मनाली कुळकर्णी )

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०

' नवीन बदल..'

घनघोर वादळासह पाऊस आला;
तुफान बरसून त्याने पूर आणला..

पुरामध्ये सारे गाव वाहून गेले;
काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले...

कालांतराने पूर ओसरला;
पडक्या भिंती सोडून,
बाकी सारेच घेऊन गेला...

जुने सावरून,नवीन घर,
आहे आत्ता बांधायचे;
पण बांधलेले घर पूर्वी सारखेच असेल,
हे नाही तितकेच गरजेचे....

आयुष्य हि असेच असते,
प्रत्येक वादळागणिक कोसळते;
जखमांचा ओलावा पुसत,
मनाच्या भिंतीना,अधिकच कणखर बनवते...

नवीन वादळे झेलण्यासाठी;
नवीन बदलांसह,त्यातून सरण्यासाठी...!!!!!!

- माधवी (मनाली कुळकर्णी)

बुधवार, २५ ऑगस्ट, २०१०

शब्दांमधला तू

शब्दांनीच आयुष्याचे चित्र रेखाटते मी;
शब्दांनीच त्या चित्रात रंग भरते मी;
नेहमीचं त्यातून तूच कसा आकाराला जातोस??
क्षणभर येतोस अन सारेच कसे रे,व्यापतोस ???
-माधवी (मनाली ) 

रविवार, २२ ऑगस्ट, २०१०

" जेव्हा अपुल्यांची साथ सुटते..!!"

खुल्या आसमंतात हि मन घुसमटते;
हसण्याच्या प्रयत्नानाही अश्रूंची धार लागते...
चुकतो हृदयाचा ठोका,
अन निरस आयुष्य नको वाटते;
अचानकच जेव्हा,
अपुल्यांची साथ सुटते...!!!!
-माधवी (मनाली)

"तुझ्यासाठी 'तुझ्यासारखे' जगायचे राहून गेले...!"

पुरतो श्वास का कधी,
हे आयुष्य जगण्यासाठी;
नेहमीच करायचे राहून जाते,
काही-बाही तुझ्यासाठी......
कितीक स्वप्न मोडले,
कितीक आस तुटल्या;
तरी साथ दिलीस तू मला,
माझ्याच शब्दाआधी ...
कितीक सांगू तुझे प्रेम,
अन धडपड हि अपुल्यांसाठी;
ठरलो मी 'नदीच',
अन तू झालीस 'सागर' ह्या प्रपंचासाठी.....
कितीक निस्वार्थी तुझे मन;
कसे जमते गं वागणे,नेहमीचं उमजून......
दगदगीत ह्या साऱ्या,
हेच शिकायचे राहून गेले;
श्वास संपत आला तरी,
तुझ्यासाठी 'तुझ्यासारखेच' जगायचे राहून गेले.....!!!!!!!
-माधवी (मनाली)

"प्रेमभंगातले सुख"

'फारकत घेतली मी हसण्यापासून;
आधार दिला जगण्याला दुखातून.....
अनुत्तरीत सोडून गेली ती मला,
अन मी उत्तरे शोधण्यातच हरविले स्वताला..
नवीन उमेदीने पुढे जाण्याऐवजी,
जुन्यातच अडकत गेलो;
स्वताला सावरण्याऐवजी,
आठवणींमधील 'तिच्यात' रमत राहिलो...
एके दिवशी मी बघितले तिला,
दुसऱ्याच्या मिठीत जाताना;
त्याच क्षणी ठोकला राम-राम,
प्रेमभंगातल्या अश्रूंना...
घरी येऊन देवापुढे,
"तिला परत आण रे !!!"
मागणारे हात जोडले;
"वाचवलेस रे,देवा मला !!!",
म्हणत एक नारळ फोडले.....
प्रेमभंगातले हि असे सुख मी अनुभवलो;
तेव्हांपासून आजतायागत फक्त हसूनच जगलो ....
हसूनच जगलो....!!!!!!!!!
-माधवी (मनाली)

"गुरूपौर्णिमेनिमित्त"


'नमवी मस्तक गुरूच्या चरणी,
आजच्या ह्या सोनियाच्या दिनी;
गुरुसाठी नसती शब्द,
परी ज्ञानाचा तो अथांग सागर;
उभे आयुष्य पुरतील,
असे त्यांचे संस्कार;
काय सांगू महती त्या गुरूची,
त्यांच्या मजवरील ऋणांची;
अखंड चालवीन हि परंपरा ज्ञानाची,
वचन देऊनी,
मस्तक ठेविते मी,
गुरूच्या चरणी,
आजच्या ह्या सोनियाच्या दिनी.......!!!!
-माधवी(मनाली)!! 
"मला घडवणाऱ्या प्रत्येक गुरु साठी माझ्याकडून हि आदरांजली..!!" 

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०

"प्रश्न हे असे माझे"

'वेदनांचे काहूर,माझ्या मनात का दाटले??
जुन्या आठवणींनी सुकलेल्या डोळ्यात,
 परत पाणी का आणले??
आता कुठे हसावेसे वाटले,
एवढ्यातच भूतकाळाने डोके का वर काढले??
खंत हि कळीची,
तिच्या दुर्दैवी नशिबाची,
उमलण्यास ती सज्ज झाली,
अन नेमके तिलाच का छाटले??
प्रश्न हे माझे असे,
उत्तराच्या अपेक्षेविना,
झाकलेल्या जखमांना,
मात्र उघडे का करून गेले??????'
-माधवी (मनाली)

"पहिल्या प्रेमाची रीत"

पहिल्या प्रेमाची रीतच न्यारी,
आयुष्यभर न सरणारी;
रुसवे-फुगवे,हट्ट,
भांडणानाही लाडिक म्हणणारी;
प्रेमाने आतून ओथंबून वाहणारी,
अन ओठावर आल्यावर मुके करणारी;
पहिल्या प्रेमाची रीतच न्यारी,
तुटके हृदय अन पोखरलेल्या मनास,
आठवणींच्या बळावर सावरणारी;
आयुष्यभर न सरणारी..!!!!
-माधवी (मनाली)

" प्रेमाचा एक प्रांजळ थेंब मी..!!"

प्रेमाच्या प्रवाहिकेतला एक प्रांजळ थेंब मी...
मनापासून कोणावर तरी जीव जडल्याची भावना मी...
विरहाच्या आक्रोशातला अश्रू मी.....
आयुष्यभर साथ देणारा श्वास मी ..
मी म्हणजे कोण??
झाकून बघ तुझ्याच हृदयात;
ते व्यापून टाकणारी तीच "मी"....!!
-माधवी (मनाली)

"खोटी नाती"

नाती कितीही खोटी असली तरी,
त्यांचा मोह सोडवत नाही...
कोणी आपल्याला आपले नाही म्हंटले तरी,
त्यांना आपले म्हणायची सवय जात नाही....
सत्य माहित असले तरी,
मन आतून विश्वास ठेवायला धजत नाही..
'क्षणभर' सुखासाठी धडपड हि सारी,
त्यास असत्याची किनार जरी,
'नैराश्यात' अडकूनही ह्या खोटया नात्यांवरचे,
'प्रेम' काही सरत नाही.....!!!
-माधवी (मनाली) !!!

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०१०

"दरवेळी सोनच चकाकते असे नाही,कधीतरी सोन्याचे पाणी चढवलेला दागिना हि जास्त चमकतो....पारख आपल्याला करता आली पाहिजे.....!!!!!."

-माधवी (मनाली)

सोमवार, १६ ऑगस्ट, २०१०

"आयुष्य असे की"

"आयुष्यात अनेक पावसाळे येतात ;नवं-नवीन अनुभवांसह नखशिखांत भिजवतात ....भिजण्यात ही एक वेगळेच सुख असते ....कधी हसत मजा घेत...कधी भिजण्याच्या नादात अश्रूंना वाट मोकळी करून देत..........!!!!" -माधवी(मनाली)

'हसता आले पाहिजे'

जीवन प्रत्येक क्षणाला एक नवीन वळण घेत असते;
सरळ वाटणारे कधी नागमोडी,
तर कधी ते तिथेच संपते;
उरतात फक्त आठवणी आणि काही डोळ्यांमधले पाणी;
भिंतीवरची तसबीर आणि काही मोजक्या श्वासांची कहाणी;
जगता आले पाहिजे प्रत्येकाला,
प्रपंचाची साथ का कोणास चुकते;
श्वास थांबतो एखाद दिवशी,
अन सगळे करूनही तेवढे 'हसायचेच' राहते......!!!!
-माधवी (मनाली)

"स्वातंत्र्याच्या दिनी"

स्वातंत्र्याच्या दिवशी मिळाल्या शुभेच्छा अनेक;HOLIDAY म्हणून आराम करत,INBOX मधले MSG वाढले एकाएक..हुतात्म्यांनी दिले बलिदान ह्याच स्वातंत्र्यासाठी;बनून राहिले आता,रस्त्यावरचा पुतळा आणि नावाची पाटी..बाबांना झालेला थोडासा उशीर,लहानग्यांच्या डोळ्यात पाणी आणतात;आजही नाबालीकेवर अत्त्याचार होतात..जीवाची शाश्वती देत,खरे स्वातंत्र्य कधी मिळणार?मनातल्या भीतीवर विजय मिळवत,जेव्हा माणूसच 'माणुसकीला' जपणार..!! -माधवी (मनाली) LET'S MOVE TOWARDS THIS KIND OF INDEPENDENCE..जय हिंद;जय महाराष्ट्र;जय भारत!