बुधवार, १ डिसेंबर, २०१०

तुझी आठवण

' तुझी आठवण ' अवेळी ,
आगन्तुकासारखी नेहमीचं येते ;
नको असलेल्या क्षणांची हुरहूर देऊन,
कालांतराने मागे फिरते...

मधल्या घटकात माझा जीव मात्र,
पणाला लावते;
अन माझी स्वः ताच स्वः ताशी
लढाई सुरु होते;
भोळी ती,
आयुष्यात नसलेल्या
अन मनात जपलेल्यांची,
सांगड घालू पहाते....

नसते तिला कसलेच भान ;
नाते तोडून देणाऱ्या,निष्ठुर शब्दांची ना तिला जाण...

अश्या मग्रूर शब्दांची मक्तेदारी मोडत ती,
गतकाळातील तुझे अस्तित्व शोधत असते ;
ह्या साऱ्या उलाढालीत तिला भविष्याची ,
साधी फिकीरही नसते ;
अन वर्तमान मात्र तिच्या ,
उघड्या,लाचार डोळ्यांमधून झिरपत  राहते ...
' तुझी आठवण ' अशीच अवेळी,
आगन्तुकासारखी नेहमीचं येते .....!!

- माधवी (मनाली कुळकर्णी )

९ टिप्पण्या:

  1. सुंदर आहे.........आठवण !!!

    माझ्या मनात आमच्या मनीची साठवण...........

    छान !!!

    उत्तर द्याहटवा
  2. M@n!.... HATS OFF!!!!!

    तुला उत्तरोउत्तर अश्याच छान छान कविता सुचोत.. हिच सदिच्छा

    मयूर

    उत्तर द्याहटवा
  3. नसते तिला कसलेच भान ;
    नाते तोडून देणाऱ्या,निष्ठुर शब्दांची ना तिला जाण...
    अप्रतिम........तुला तुझ्या यशासाठी लाख लाख शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा