गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०

"खोटी नाती"

नाती कितीही खोटी असली तरी,
त्यांचा मोह सोडवत नाही...
कोणी आपल्याला आपले नाही म्हंटले तरी,
त्यांना आपले म्हणायची सवय जात नाही....
सत्य माहित असले तरी,
मन आतून विश्वास ठेवायला धजत नाही..
'क्षणभर' सुखासाठी धडपड हि सारी,
त्यास असत्याची किनार जरी,
'नैराश्यात' अडकूनही ह्या खोटया नात्यांवरचे,
'प्रेम' काही सरत नाही.....!!!
-माधवी (मनाली) !!!

३ टिप्पण्या:

  1. खरं सांगायचे तर माणुस हा प्राणि प्रेम, आपुलकी, माया आणि ममता या ४ गोष्टींमध्ये गल्लत करतो, नात्यांमधील गोडवा हा फ़क्त आजच्या जमान्यात फ़क्त देखावाच राहिला आहे... जगाला दाखवण्यासाठी एकत्र यायचे आणि आपापसांत मात्र मतभेद.. एकत्र येणे म्हणजे फ़क्त निव्वळ दिखाऊ पनाचे राहिले ..पण प्रेम ही भावना नात्यांमधील नाते तुटू देत नाही मग ती कितीही कच्ची का असोनात ...
    यालाच म्हणतात "दुनियेचा भुलभुलैय्या"

    उत्तर द्याहटवा