गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०

"प्रश्न हे असे माझे"

'वेदनांचे काहूर,माझ्या मनात का दाटले??
जुन्या आठवणींनी सुकलेल्या डोळ्यात,
 परत पाणी का आणले??
आता कुठे हसावेसे वाटले,
एवढ्यातच भूतकाळाने डोके का वर काढले??
खंत हि कळीची,
तिच्या दुर्दैवी नशिबाची,
उमलण्यास ती सज्ज झाली,
अन नेमके तिलाच का छाटले??
प्रश्न हे माझे असे,
उत्तराच्या अपेक्षेविना,
झाकलेल्या जखमांना,
मात्र उघडे का करून गेले??????'
-माधवी (मनाली)

२ टिप्पण्या:

  1. अगदी समर्पक कविता रचली आहेस मनाली..
    प्रश्न डोक्यांत अनेक काहूर माजवतात...
    आणि योग्यवेळी ते प्रश्न बाहेर नाही आले तर मग ते तसेच राहतात ..

    उत्तर द्याहटवा
  2. asech anek prashna asatat ayushyat tyanchi kahich ani kadhich uttara milat nahi its great !!!!!!!

    उत्तर द्याहटवा