गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०

" प्रेमाचा एक प्रांजळ थेंब मी..!!"

प्रेमाच्या प्रवाहिकेतला एक प्रांजळ थेंब मी...
मनापासून कोणावर तरी जीव जडल्याची भावना मी...
विरहाच्या आक्रोशातला अश्रू मी.....
आयुष्यभर साथ देणारा श्वास मी ..
मी म्हणजे कोण??
झाकून बघ तुझ्याच हृदयात;
ते व्यापून टाकणारी तीच "मी"....!!
-माधवी (मनाली)

1 टिप्पणी:

  1. "मी" हा शब्द दोन व्यथा मांडतो एक तर मी किती सुखी आहे आणि दुसरी म्हणजे मी किती दु:खी आहे....
    काहींना "मी" पणा हा अहंकार वाटतो तर काहींना तो स्वाभिमान वाटतो

    म्हणूनच काव्यसृष्टित मी पणाला अहम स्थान आहे

    बाकी कविता मस्त जमली आहे

    उत्तर द्याहटवा